Jamin Mojani भूमि अभिलेख विभागाकडून केल्या जाणा-या शासकीय जमीन मोजणीचे प्रकार किती व कोणते याची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
Jamin Mojani जमीन मोजणी मोजणीचे खालील प्रकार पडतात–
- शेतजमीन हद्द कायम.
- पोटहिस्सा.
- बिन शेती.
- नगर भूमापन हद्द कायम.
- भूसंपादन.
- कोर्ट वाटप.
- कोर्ट कमिशन.
- निमताना मोजणी.
- विभाजन प्रकरणातील मोजणी.
शासकीय जमीन मोजणीच्या प्रकारांबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
1. शेत जमिनीची हद्द कायम मोजणीची सर्वसाधारण कार्यपद्धती
जमीन धारकांस उपलब्ध असलेल्या अभिलेखा प्रमाणे त्यांचे गटाची किंवा पोटहिस्य्याची हद्द कायम करुन मागता येते. जमीन मोजणी करिता नमुन्यातील तपशील संपूर्ण भरून उपअधीक्षक भूमि अभिलेख यांचे कडे अर्ज करावा लागतो. मोजणी करुन घेणे करिता साधी / तातडी / अतितातडी फी भरणेचा पर्याय उपलब्ध आहे. मोजणी अर्ज प्राप्त झाल्यावर प्रकारानुसार संगणकाद्वारे मोजणी रजिष्टर नंबर देउन प्राथम्य क्रमानुसार अर्जाबाबत मोजणी कार्यवाही करण्यात येते. परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यावर मोजणी प्रकरण निकाली काढणेचा विहीत कालावधी साधीमोजणी ६ महिने, तातडी ३ महिने व अतितातडी २ महिने असा आहे.
मोजणीपूर्वी लगत कब्जेदारांना विहित मुदतीत नोटीस काढणेत येते. मोजणी फलकयंत्राचे सहाय्याने करणेत येउन अभिलेखा प्रमाणे हद्द जागेवर दाखवणेत येते. मोजणीचे वेळी अर्जदारास मोजणी कामी लागणारे निशाणदार मजूर, चुना, बांबु वर्गरे बाबी पुरवाव्या लागतात. दाखवलेल्या हद्दीवर दगड रोवून घेणेची जबाबदारी अर्जदार यांची असते. भूकरमापकाने केलेली मोजणी मान्य नसलेस प्रथम निमताना (उच्च तपासणी) व ती सुद्धा मान्य नसलेस सुपरनिमताना मोजणी विहित फी भरुन मागता येते. हद्द कायम मोजणी अंती मोजणी नकाशा ची क प्रत अर्जदारास विनामुल्य पुरविणेत येते. बऱ्याच (सहहिस्सेदारांना) शेतक-्यांना त्यांचे वहिवाटीनुसार किंवा ७ १२ क्षेत्रा नुसार मोजणी हवी असते तथापि त्यांचे संयुक्त धारण क्षेत्राची पोटहिस्सा मोजणी मध्ये येते. त्यामुळे त्याबाबत पोटहिस्सा मोजणी अर्ज सादर करावा.
शासकीय जमीन मोजणीच्या प्रकारांबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
2. शेत जमीनीची पोट हिस्सा मोजणी
सर्व सहहिस्सेदारांची संमती असलेस त्यांचे वहिवाटीनुसार किंवा क्षेत्रानुसार पोटहिस्सा मोजणी बाबतची कार्यवाही करुन पोटहिस्सा नकाशाचा व आकार(सारा) याचे विभाजन मोजणीअंती करणेत येते. तथापि एकत्रीकरण कायद्यानुसार तुकडा पडत असलेस अशी मोजणी करता येत नाही. मोजणी फीचे चलन भरुन विहीत नमुन्यातील अर्ज उपअरधीक्षक भूमि अभिलेख यांचेकडे करावा लागतो. या मोजणी करीता साधी / तातडी/ अतितातडी हे पर्याय उपलब्ध आहेत.
पोटहिस्सा मोजणी करताना मुळ सव्र्हे क्रमांकाची हद्द विचारात घेउन अर्जदारांचे वहिवाटी नुसार किंवा क्षेत्रानुसार तुकडेबंदी नियमास अधीन राहून नविन पोटहिश्याचा नकाशा तयार करणेत येतो व पोटहिस्सा नमुना ४ भरुन क्षेत्राची समज संबंधितांना देणेत येते तसेच नंतर पोटहिस्सा फॉर्म नं. ११ द्वारे आकार विभागून पोटहिस्सा नमुना नं. १२ (फाळणी बारा) हा ७/१२ ची वेगळी पाने उघडणे कामी संबंधित तलाठी यांचे कडे नकाशासह पाठविणेत येतो. महसूल विभागाकडून त्याप्रमाणे ७/१२ वेगळे करणेत येतात. मोजणी फी तक्त्याप्रमाणे आकारली जाते. पोटहिस्सा मोजणीचे प्रलंबीत काम खाजगी संस्थामार्फत करुन घेणेचे शासनाचे प्रयत्न चालू आहेत.
शासकीय जमीन मोजणीच्या प्रकारांबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
3. बिनशेती मोजणी
समक्ष प्राधिका-्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायदा कमल ४४ अन्वये कायम बिनशेतीचे आदेश पारित केल्यास बिनशेती मोजणी करणेत येते. बिनशेती मोजणी करणेसाठी सक्षम प्राधिकारी यांचे कडील मंजूर रेखांकनाचा नकाशा आवश्यक असतो. सक्षम प्राधिका-्याचे या आदेशासह विहीत नमुन्यात मोजणी अर्ज, मोजणी फी सह उपअधीक्षक भूमि अभिलेख यांचे कडे सादर करावा लागतो. ही मोजणी १ : ५०० या परिमाणात केली जाते. बिनशेती बाबतची नोंद गाव नमुना नं. २ मध्ये घेणेत येते. नगर भूमापन क्षेत्रातील बिनशेती मोजणीअंती व अधिकार अभिलेख तपासून मिळकत पत्रिकेवर नोंदी घेणेत येतात.
4. नगर भूमापन हद्द कायम
ज्या महानगर पालिका / नगर पालिका / २००० हजार लोकसंख्येवरील गावठाणांचे सर्वेक्षण पूर्ण होऊन त्याचे परिनिरीक्षण चालू आहे तेथे नगर भूमापन अभिलेखाप्रमाणे मोजणी करुन हद्द कायम करुन घेता येते. सदर क्षेत्रात मिळकत पत्रिका हाच अधिकार अभिलेख आहे.
याकरीता विहीत नमुन्यातील अर्ज योग्य त्या कागदपत्रासह संपूर्ण भरुन विहीत मोजणी फी भरून उपअरधीक्षक भूमि अभिलेख यांचे कडे करावा लागतो. या मोजणी करीता साधी/ तातडी / अतितातडी/ अतिअतितातडी असे पर्याय उपलब्ध आहेत. अति अतितातडी मोजणी ची मुदत १० दिवस आहे. ज्या नगर भूमापनाकडील मिळकती बिनशेतीकडे वर्ग झालेल्या नाहीत व त्यास सक्षम प्राधिकाऱ्याकडून बिनशेती आदेश प्राप्त नाहीत तेथे ते प्राप्त करुन प्रथम बिनशेती मोजणी करुन नंतरच मिळकत पत्रिकेवर नावे दाखल करुन घ्यावी लागतात.
नगर भूमापन हद्दीत समाविष्ट सर्वे नंबर पैकी शेतीकडे राहिलेल्या भागाचा ७/१२ हा अधिकार अभिलेख आहे. विहीत मुदतीतच्या आगाऊ नोटीसद्वारे अर्जदार व लगत कब्जेदार यांना कळवून अभिलेखाचे आधारे मोजणी करणेत येउन हद्दी दाखविण्यात येतात. मोजणीअंती योग्य त्या टिपांसह क प्रत अर्जदारास मोफत पुरविणेत येते. समान सत्ताप्रकार व धारकांच्या मिळकती असतील तर त्यांचे एकत्रीकरण म. न. पा. / न. पा. यांचे कडील मंजूरी आदेश व नकाशा यासह अर्ज केल्यास करता येते. मिळकतीचे पोटविभाजन करण्यासाठी म. न. पा. / न. पा. यांचेकडील मंजूरी ओदश व नकाशा व सहहिस्सेदारांचे संमतीपत्र विहित पोटहिस्सा मोजणीसाठी अर्ज आवश्यक असतात.
हे वाचले का?
- घर खरेदी करतांना कोणती आवश्यक काळजी घ्यावी…!!
- गावं करील तो राव काय? या कठीण काळात गाव वाचविण्यासाठी हे नक्कीच करा.
- ग्रामसभा आमचा हक्क आमचा आवाज! लोकशाही नको आता लोकसहभाग शाही हवी..!
- घर, दुकान, बांधकाम रस्त्यापासून किती मिटर हवे सर्व कायदेशीर माहिती
- ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? चला समजून घेऊया..!
- वाहतूक पोलिसांना गाडीची चावी काढण्याचा अधिकार आहे का….?
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा